गौरी...
भरपूर तंगवलं गं तुला लपंडाव खेळताना. आणि तुला आठवत का गं... आपण बागेत खेळताना.. मध्येच पाणी प्यायला गेस्ट हाऊस मध्ये जायचो आणि बाहेर पडताना तिथून टेबलवर ठेवलेली साखर खायचो... गेस्टहाऊस मधला बापू आणि काका ओरडायचा किती... आणि पाणी सुद्धा पिताना प्यायचे कमी सांडायचे जास्ती...
आणि टँकवर मासे पकडायला जायचो... आणि पकडून परत सोडून द्यायचो पाण्यात. वॉचमन ओरडायचा...
चिंचा काढून त्याला तिखट, मीठ, साखर लावून त्याचे गोळे बनवायचे आणि काडीला लावून खायचे...
कच्च्या कैऱ्या... गेस्टहाऊस मधलं तिखट आणि मीठ. श्रेष्ठी काकूंच्या झाडाच्या कैऱ्या तोडायच्या.. त्यांना राग यायचा . किती ओरडायच्या त्या. डेक्कन क्वार्टर्स मधली तमाम मुलं त्यांना घाबरायची.
आता काही नाही गं राहिलं तिथे.. मिल बंद पडली आणि... सगळी रयाच गेली आहे डेक्कनची. कधी इचलकरंजीला गेले तर.. त्या रोडवरून जाताना सुद्धा डोळे पाणावतात. आपलं बालपण जिथे गेलं आज ती जागा म्हणजे नुसतं माजलेलं रान झालं आहे...
धन्यवाद. तुझ्या लेखामुळे पुन्हा मन भरून आलं. पण हे खूप छोटं लिहिलं आहेस.. जरा विस्तृत लिहायचंस.. आवडला लेख.
- प्राजू (आठवणीत रमलेली)