प्रदीप....
तुमच्या कवितांमधून शब्दांच्या रेशमी लडी उलगडत जातात... यात अतिशयोक्ती नाही...
प्रत्येक कडव्यातून खूप गहिरा भाव पोचतो... रसनिष्पत्ती हा खरा हेतू असेल तर या सगळ्या कवितांना १२० टक्के यश आहे... नक्कीच...
त्या सुरांमधून सोड तू तुझा हळूच श्वास !
मधला 'सोड' हा शब्द थोडा कानाला खटकला... खूप हळुवार आणि तरल कवितेत तेवढा एकच मला थोडा तीव्र वाटला.. पण हे माझ वैयक्तिक मत आहे... तो तसाच असणे अभिप्रेत असेल तर प्रश्नच नाही...