वाह! मला लग्नसोहळे नेहमीच छान वाटतात. ते लोकांचं जमणं, त्यांचं सुंदर दिसणं, वातावरणातील हुरहुर, उत्सुकता, उत्साह, लगबग, नवेपणा, गप्पांचा फड इ. मुळे लग्न हा माझा तरी आवडता समारोह आहे. मग ते मराठी लग्न असो, दक्षिण भारतीय असो, बंगाली (खुर्चीवरून वरात  ) असो, काश्मिरी असो, पारशी असो, मुसलमानांकडचे असो की ख्रिश्चन पद्धतीचे. लग्नापेक्षा लग्नसोहळा नेहमीच भाव खाऊन जातो  

तुम्ही केलेलं हे वर्णन तर उत्तम वर्णनशैलीचा एक नमुना आहे. "....असं किंवा यातलं कोणतंच दृश्य जरी मानहाईमच्या चर्च च्या दाराशी अपेक्षित नव्हतं तरी इतकी सामसूम सुद्धा अपेक्षित नव्हती...", "हातात हात गुंफून", "सांद्र की कायशा त्या संगीताने (पु.ल. आठवले उगाच  )", "प्रेमाचा गुलाबी रंग स्ट्रॉबेरी केक मध्येही उतरला होता" इत्यादी अनेक वाक्ये, शब्द आवडले. लहान लहान तपशील नेटकेपणाने मांडले आहेत.

अशाच अधिक लेखनाच्या प्रतीक्षेत आहोत. अजून येऊ द्यात!. पुढील लेखनास अनेकोत्तम शुभेच्छा!

-ऋषिकेश

काहीसे अवांतर एखाद्या पद्धतीतील त्रुटी अथवा समस्या विनोदाच्या अंगाने दाखवणे फार आवडले. पण इतर (म्हणजे आपल्याकडच्या) लग्नातले नक्की काय मिस केले (मराठी?) हे ही आले असते तर बहार आला असता असे वाटले.