आज लोकांची डॉक्टर कडे जाण्याची  frequency खूप वाढली आहे. थोडं बरं नसलं की सगळे डॉक्टर कडे पळतात. लोकांना सुद्धा पटकन गुण हवा असतो. प्राथमिक औषधं घेऊन बरं होण्यासाठी पेशन्स आणि वेळ दोन्ही नसतो.त्यामुळे आपसुकच prescribed औषधं दिली जातात. हा झाला एक angle.

दुसरं म्हणजे आजकाल माणसाची शारिरीक प्रतिकार शक्ती सुध्धा वेगवेगळ्या कारणानी कमी झाल्येयं. त्यामुळे कित्येकदा साध्या औषधांचा परिणाम चटकन आणि निटसा होत नाही. शरीराला antibiotics ची सवय होत चालल्येय.

लहान मुलांना साध्या साध्या कारणांसाठी child स्पेशालिस्ट कडे नेलं जातं जे काम कित्येकदा चांगला MBBS किंवा आयुर्वेदिक डॉक्टर सुध्धा करू शकतो. माझा स्वतः चा असा अनुभव आहे जिथे माझ्या मुलीचा ताप child स्पेशालिस्ट बरा करू शकला नाही आणि T.B ची ब्लड टेस्ट करायला सांगितली. शेवटी मी आमच्या family डॉक्टर कडे घेऊन गेलो. आणि त्यांनी कुठलिही टेस्ट न करता ताप बरा केला. स्पेशालिस्ट कडे अनेक patients गेल्यावर तो कोणाकडे आणि किती स्पेशल लक्ष देणार?

ह्या सर्व प्रोब्लेम्स ना माझ्यामते एक उपाय आहे. प्रत्येकाने आपला एक ठरावीक family डॉक्टर ठेवावा म्हणजे दोघांनाही एकमेकांचा confidence येईल आणि problems कमी होतिल.