जर्मनांमध्ये आदल्या दिवशी नवरा,नवरी मित्र,नातेवाईक एकत्र जमतात आणि पोर्सेलिनच्या/चिनीमातीच्या (काचेच्या नाही)  वस्तू फोडतात,त्या नवरानवरीने गोळा करायच्या असा रिवाज आहे. ह्याला 'पोल्स्टर आबेंड' म्हणतात. हल्ली हा रिवाज बरेच जण पाळत नाहीत.तसेच लग्नाच्या दिवशी ब्रायडल डान्स नंतर वधूला जवळपासच्या ठिकाणी मित्रमंडळी लपवून ठेवतात आणि वराने तिला शोधायचे असते.तिला लपवताना ही मंडळी बऱ्याच बार्स मध्ये जाऊन यथेच्छ बिअर,वाईन पितात.आणि बिल नवरामुलगा देतो.:)
लग्नाच्या दुसऱ्या दिवशीचा ब्रेकफास्ट म्हणजे आपले कंकण सोडणे/मांडव परतणी सारखाच प्रकार असतो,पण ह्यासाठी सुद्धा सगळेच निमंत्रित थांबतात असे नाही.(आम्ही अर्थातच थांबलो होतो.)
स्वाती