तुमचा लेख आवडला. मनाला चटका लावून गेला. विद्यापीठात असताना मी प्रेमाच्या नावावर शून्य गूण मिळवले. माझ्या अनेक मित्रांची प्रेमाच्या परीक्षेला बसून अनुत्तीर्ण झाल्यावर अनेक महिने झालेली दशा आणि त्याचा अभ्यासावर होणारा परिणाम मी पाहिला आहे. (काहींच्या प्रेमाचे नंतर लग्नात पर्यवसान झाले). पण त्या दिवसात मी ह्या भानगडीत पडलो नाही ह्याबद्दल मला बरेच वाटत होते. कॉलेज संपून बरीच वर्षे उलटल्यावर एक जुना मित्र भेटला आणि त्याने "अरे एवढा रे कसा तू 'हा'" असे असे डोळे फिरवून सांगितले, आणि म्हणाला की अरे ती अमुक अमुक मैत्रीण तुझ्या इतकी मागे लागली होती आणि तुला पत्ताही नाही लागला कधी?". "नाय ब्वा! माझ्या तर कधी गावीही नव्हते", मी. नंतर कॉलेज जीवनातल्या अनेक प्रसंगांची उजळणी केल्यावर मित्राच्या म्हणण्यात तथ्य आहे असं मला पटलं.
आज तुमचा लेख वाचल्यावर तिच्या मनात त्यावेळी काय झाले असेल याची कल्पना आली, म्हणून चटका!

त्या मित्राची भेट झाल्यावर योगायोगाने काहीच दिवसानंतर ह्याच मैत्रिणीचे मला ईमेल "काय रे कसा आहेस, मी आता तुझ्याच कंपनीत अमुक अमुक विभागात कामाला लागले आहे". नंतर यथावकाश ह्या मैत्रिणीचे कुशलही कळले. कॉलेजनंतर आणखी उच्चशिक्षण घेऊन नंतर मग लग्न करून आता ती आनंदात आहे हे ही तिच्याकडूनच कळले.