दुसरं म्हणजे, खऱ्या (एका पिळाच्या आणि त्यामुळे एकाच पृष्ठभागाच्या) मोबियसपट्टिकेत कवितेचा दुसरा अर्धा भाग 'ऍलिस थ्रू द लूकिंग ग्लास'मधल्या 'जॅबरवॉकी'सारखा उलट्या अक्षरात छापलेला असायला पाहिजे होता. किंवा, अर्ध्या कवितेनंतर अचानकपणे (ऍबरप्टली) उलट्या अक्षरात छापण्याऐवजी हळूहळू (ग्रॅज्युअली) अक्षरांचं संक्रमण सुलट्याकडून उलट्याकडे व्हायला पाहिजे होतं.

सहमत आहे. इथे शून्याळलेलं विश्वपासून ....सूक्ष्माळलेलं शून्य पर्यंत सरळ वर्तुळ पूर्ण झाल्यासारखे वाटलं आणि पुन्हा वर्तुळावर सरळ चक्कर. सूक्ष्माळलेलं शून्यानंतर सर्व उलटं व्हायला हवं होतं, आरशातील प्रतिकृतीप्रमाणे शब्द नाहीत तरी शब्दांची उलटापालट हवी होती. श्ववी लंलेळन्याशू इ. असं वाटतं.

नारळीकरांच्या गोष्टीत डाव्या सोंडेचा गणपती या मोबिअसपट्टीकेवर उजव्या सोंडेचा झाला होता ते आठवून गेले.