उजदारी म्हणजे उगवतीच्या दारी. घराचे समोरचे दार ते उजदार आणि मागचे दार ते परसदार. उजदार, अंगण, सोपा, माजघर, स्वयंपाकघर, परसू आणि परसदार अशी जुन्या घरांची रचना असे. (मी स्वतः अशा घरांत बरीच वर्षे राहिलेलो आहे) जाते, उखळ, बंब, कोनाडे, शिंकाळी, दारांना लावायचे अडणे, जुनी, हाताने तयार केलेली काट्याची कुलुपे, चूल, गोवऱ्या, दुभत्याचे कपाट, देवघर, शंकराची दगडी पिंड, तांब्याचे जुने प्रचंड हंडे, बाळंतिणीची अंधारी खोली... असले सगळे जुनाट आणि जी.एं. ना अतिशय प्रिय असलेले वातावरण अद्यापही खेड्यातल्या घरांत आढळते.
प्रतिसादाबद्दल सर्वांचा आभारी आहे.