भारतीय भाषांमध्ये कंप्युटर सॉफ्टवेअर्सचे स्थानिकीकरण
(localization)करण्याचे काही प्रकल्प चालू आहेत. त्यापैकी एक म्हणजे
'GNU/Linux'
ह्या ऑपरेटींग सिस्टीम व त्यावरील काही प्रोग्रॅम्सचे मराठीत स्थानिकीकरण
करण्याचा प्रकल्प चालू आहे:
http://www.indictrans.org/index_files/Marathi/index_mr.php
प्रकल्पाच्या उद्दिष्टांबाबत प्रस्तावना
=====================
इंग्रजीचे फारसे
किंवा अजिबात ज्ञान नसलेल्या
भारतातील व्यापक वर्गासाठी संगणक तंत्रज्ञान उपलब्ध करुन देण्याच्या
दृष्टीने एकत्रित प्रयत्न करण्यासाठी सहकार्याची हाक देण्याच्या उद्देशाने
सुरु केलेल्या वेबसाईटमध्ये आपले स्वागत आहे. सद्यस्थितीतील सर्व
कार्यांची नोंद करणे, त्याविषयी जनजागृती करणे, भाषांतर करणे,
त्यासाठी लागणारी सर्व साधनसामुग्री उपलब्ध करुन देणे, सॉफ्टवेअर साधने
निर्माण करणे, आणि जागतिक दर्जाचे शैक्षणिक सॉफ्टवेअर भारतीय भाषांमध्ये
उपलब्ध करुन सॉफ्टवेअरचा मुक्तपणे वापर करण्यास उत्तेजन देणे या बाबींवर
आमचा भर राहील.
=====================