वय वेडे असते त्रिशराव. अशी खूप उदाहरणे आजूबाजूला दिसतात. पण सर्वस्व पणाला लावणे हा मुलांचा कल असतो. मुली बहुतेक व्यवहारी असतात. वयाने चारपाच वर्षांनी जास्त पण आर्थिक स्थैर्य असलेला मुलगा त्या जास्त पसंत करतात अशी टिप सिनिअर्सकडून मिळाल्यामुळे आमच्या काळी म्हणाजे ६० च्या दशकाच्या उत्तरार्धात स्वतःच्या कॉलेजच्या तिसर्या वर्षापासून ज्युनिअर म्हणजे पहिल्या वर्षातील मुलींकडे आम्ही 'त्या' नजरेने पाहात असू. आमच्या वर्गातील मुली सिनिअर्ससाठी होत्या.