नमस्कार,
गजल मधील रदिफ, काफिया, हुस्नेमत्ला, वगैरे गोष्टी संगणक दाखवून देतो. यात मराठीत किंवा हिंदीत टाईप करता येते. तुम्ही टाईप करत जाताना संगणक प्रत्येक ओळ दर सहा सेकंदाला २२ लाख वेळा तपासतो आणि तुमच्या समोर गजलेचे गुणधर्म सादर करतो. रदिफ अक्षरे लाल रंगात व अक्षरातील काफिया निळ्या रंगात आपोआप दिसतो. लिहीलेल्या ओळीतील गजलीचे छंद संगणक नावानीशी ओळखतो. १९ सालीम छंद आणि २५५ उपछंद संगणक ओळखतो व त्यांची विविध माहिती दाखवितो. यात गजल कवितेच्या अंगाने ओळखण्याची सोयही मी करून दिली आहे.
संगणक गजल-कविता लिहित नाही. प्रज्ञा व प्रतिभा या केवळ माणसातच असतात. संगणक तुम्हाला पेन-कागद यापेक्षा बरीच जास्त मदत करू शकतो इतकेच! लिहिलेली गजल-कविता कशी आहे हे संगणक ओळखतो किंवा गजल-कविता करण्यात संगणक मदत करतो, हे लक्षात घ्यावे.
कवितेच्या प्रत्येक ओळीतील अक्षरसंख्या, मात्रा, लघु-अक्षरसंख्या, गुरू-अक्षरसंख्या, लगक्रम, आवर्तन वगैरे बऱ्याच गोष्टी संगणक ओळखून दाखवितो. पारंपारीक संस्कृत, मराठी, हिंदी रचनांतील वृत्त, जाती, छंद संगणक ओळखतो. ११७१ वृत्ते, ५९१ जाती, ८३ छंद तो नावानिशी ओळखतो.
यातून सर्व वृत्त, जाती, छंद याबाबतची माहिती घर बसल्या मिळते. त्यासाठी कोणत्याही वाचनालयात जायची गरज नाही. सर्व भारतीय भाषांमधील वृत्त, जाती, छंद, संगणकाच्या बायनरीची वृत्ती, गजलेचे अंतरंग यांचा गेली २५ वर्षे अभ्यास करून हे सॉफ़्टवेअर तयार केलेले आहे. वृत्त, जाती, छंद यांची नुसती माहिती न देता, तुम्ही संगणकात टाईप केलेल्या मराठी ओळीत कवितेचे व गजलेचे गुण आहेत का?, हे संगणक ओळखतो हे कृपया लक्षात घ्यावे. या सॉफ़्टवेअर सोबत मी माझी पुढील पुस्तके मोफत देत आहे.
१) मानवी भाषा विज्ञानः उच्चार सातत्य
२) मराठी पद्यातील लगुत्व ओळखण्यासाठीचे नियम
३) पर्सिप्शन, साउंड, प्रोज अँड पोऐट्री (इंग्रजी भाषेतील पुस्तक)
जगातील कोणत्याही भाषेतील कविता मराठीत लिप्यंतरीत करून लिहिलीत तर त्याही भाषेतल्या कवितेचे गुणधर्म तुम्ही यातून ओळखू शकता. मराठी भाषाच हे घडवून आणू शकते. इतर कोणत्याही भाषेला हे शक्य होणार नाही. याबाबतचे 'मराठी भाषाविज्ञान: ध्वनी ते अक्षर निर्मिती' हे पुस्तक मी लवकरच प्रसिद्ध करणार आहे.
आता हे सॉफ़्टवेअर विक्रीसाठी तयार आहे. किंमत २०८० रूपये महाराष्ट्रात व २२०० रूपये महाराष्ट्रा बाहेर आहे. इच्छूकांनी अधिक माहितीसाठी पुढील ईमेलवर विचारणा करा.
आपला,
शुभानन गांगल
१९/२०, आयडियल अपार्टमेंटस, गुलमोहर रोड, जुहू, मुंबई ४०००४९.
मोबाईलः ९८३३१०२७२७, फोनः ९१-२२-२६२०१४७३.