स्वगत आवडले. मुद्दा विचार करण्यासारखा आहे. उत्तर मिळायला काही सेकंद उशीर झाला तरी आपल्याला दुर्लक्ष करतोय अशा शंका येतात. ज्याकाळी पोस्टकार्डवरून खुशाली कळत असे तेव्हा परिस्थिती कशी असावी? सध्या परिस्थिती फारच कठीण झाली आहे. चोवीस तास प्रत्येक सेकंदाला शब्द, ध्वनी, चित्रफिती या सर्वांच्या रूपाने माहिती, संवेदना, कल्पना यांचा अविरत भडिमार होतो आहे. दर अर्ध्या सेकंदाला एक नवीन ब्लॉग तयार होतो. आणि हे वाढतच जाणार आहे. अशा परिस्थितीत आपल्याला नेमके काय हवे ते कळणे फारच महत्त्वाचे आहे. यावर कालच ही चित्रफित बघायला मिळाली.
हॅम्लेट