कलांचा समाजावर आणि समाजाचा कलेवर सतत परिणाम होत असतो. चित्रपटासारख्या अनेक द्रूकश्राव्य कलांच्या संगमातून बनणाऱ्या माध्यमांवर समाजात घडणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टींचा परिणाम होणारच.
आणि वर उल्लेखिलेल्या गोष्टींपैकी (भुताच्या सोडून द्या ) बऱ्याचशा प्रकारच्या व्यक्ती समाजात आहेत हे नाकारून कसं चालेल? जर अश्या व्यक्ती समाजात आहेत तर त्यांवर चित्रपट बनवणं किती चूक? आता राहता राहिला मुद्दा अश्या पात्रांना वजन देण्याचा (ग्लोरिफाय करण्याचा) तर हे ग्लोरिफिकेशन मात्र चूक वाटतं पण त्यासाठी कथासुत्रावर सेंसॉर लावायची गरज मला तरी वाटत नाही