चित्रपटच कशाला, हल्लीच्या दूरदर्शन मालिका ( मराठीसुद्धा!) पहाल तर त्यातही हिंसा, विवाहबाह्य संबंध सर्रास दिसून येतात. घराघरात पोहोचणाऱ्या या मालिका मुलंही बघत असतात.. पण  मानसिकतेवर खोलवर परिणाम करणारा हा एकमेव घटक नाही. अनेक बाबींचा एकत्रितपणे विचार करावा लागेल. म्हणूनच अशा कथानकांमुळे समाज घडत - बिघडत असेल असे वाटत नाही. समाजाच्या एका कोपऱ्याचे जरी ते चित्रण असेल तर त्याचेही भान असणे आवश्यक नाही का?