अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाचा शोध लागण्यापूर्वीचे जगाच्या नकाशातले पश्चिमेकडचे देश म्हणजे युरोपातील देश.  तिथली संस्कृती ती पाश्चिमात्य किंवा पाशात्‌त्य संस्कृती.  भारत आणि त्याच्या पूर्वेच्या  देशांची संस्कृती ती पौर्वात्य संस्कृती.  मधल्या लोकांची (अरबी)मुसलमान संस्कृती. याशिवाय रोमन, इजिप्शियन, माया, इंका, सिंधू इत्यादी अनेक संस्कृती भरभराटीला येऊन लुप्त झाल्या. संस्कृती कुठलीच वाईट नसते.  आपल्या कल्पना चुकीच्या असतात.  पाश्चात्त्य संस्कृतीला केवळ अज्ञानापोटी आपण (निष्कारण) नावे ठेवतो. तशी ती वाईट असती तर तिथे एवढे उत्तमोत्तम तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ निर्माण झालेच नसते.  ती राष्ट्रे प्रत्येक क्षेत्रात पौर्वात्यांच्यापुढे गेलीच नसती.  त्यामुळे ही नावे भौगोलिक आहेत, प्रतीकात्मक नाहीत.