शब्दकोशात वेस्टर्न म्हणजे पाश्चात्त्य ह्या शब्दाचे खालील अर्थ आणि उपयोग सांगितले आहेत.  १. पश्चिमेकडचा. २.पश्चिमेकडे तोंड असलेला. ३. पश्चिमेकडून वाहणारा(वारा). ४. पश्चिमेकडून येणारी (वादळे). ५. पश्चिमेकडच्या लोकांचा (चित्रपट, खेळ )किंवा त्या लोकांची (कादंबरी किंवा संस्कृती).  ६. वेस्टर्न चर्च;  वेस्टर्न एम्पायर; पश्चिम गोलार्ध वगैरे वगैरे.  हे पाहिल्यावर वेस्टर्नचा अर्थ पश्चिमी असा दिशादर्शक आहे असे दिसते.