आपली लेखनशैली आवडली. मागचा लेखही आवडला होता.
एकटं वाटतं कधीकधी हे खरंच. किंवा आपण आपल्या परीचितांना 'बोर' तर करत नाही ना असेही बरेचदा वाटून जाते. बरेचदा 'शाळा कॉलेजच्या वयानंतर नोकरीत आल्यावर चांगले जीवाभावाचे मित्र मैत्रिणी बनवण्याची क्षमताच कमी झाली आहे.' असं वाटायला लागतं.. पण एक सांगते, गप्पांची भट्टी पण अशी मुद्दाम जमवू म्हणून जमत नाही. पण जेव्हा आपल्याला आणि समोरच्याला वेळ खूप कमी असतो तेव्हा नेमकी चांगली जमते. एकमेकांच्या संपर्कात राहणे महत्त्वाचे. रोज किती तास बोलणे/गप्पा होतात याला विशेष महत्त्व नसावे. संकटकाळी आणि आनंदाच्या प्रसंगी आपल्याइतकेच दुःख आणि आनंद अनुक्रमे ज्याला होतो तोच खरा मित्र.