चित्रपट पाहिला. मनापासून आवडला. पुन्हा पाहण्याची उबळ येण्याइतपत (हे माझ्या बाबतीत एरवी फारसं होत नाही).
दर्शिल चा जन्मच मुळी या भूमिकेसाठी झाला असावा असं कुठल्यातरी परीक्षणात वाचलं - ते खरं वाटावं इतका सुंदर अभिनय आहे.
आमिर खानबद्दलचा आदर या चित्रपटामुळे दुणावला/तिणावला. त्याच्या रुपाने एक संवेदनशील दिग्दर्शकच नाही, तर यशापयशाची (फारशी) चिंता न करता मनाला आवडेल ते पडद्यावर मांडण्याची इच्छा, धडाडी, आर्थिक आणि व्यावसायिक पाठबळ, आणि अगदी ऑस्करपर्यंतचा अनुभव गाठीशी असलेला निर्माता मिळाला आहे - ही आनंदाची गोष्ट आहे.
- कोंबडी