खरंच! एकलव्य सारखा चित्रपट ऑस्करला पाठवतो आपण! म्हणजे निवडसमिती डोळे बंद करून निवड करत होती की काय असा प्रश्न पडतो. तारें जमीन पर तर बघायचाच आहे. पण एकलव्य बघितल्याचा सतत पश्चाताप होत आहे. आणि अमिताभच्या व्यक्तीरेखेचा संबंध अगदी ओढून ताणून एकलव्या च्या व्यक्तीरेखे शी जोडला आहे. पुराणातला एकलव्य हा गुरू-शिष्य परंपरा शिकवतो. तर यात अमिताभ हा फक्त आज्ञेचे पालन करणारा असतो. काय त्याचा त्या एकलव्या च्या कथेशी संबंध आणि साधर्म्य? त्या चित्रपटाला "गुलाम" हे शिर्षक शोभले असते.... ते जावू द्या आता..... काय बोलणार? सहज एकलव्या चा विषय निघाला म्हणून हे सगळे लिहिले.

एनिवेज! तारे बघायचाच आहे. आमच्या चार बर्षाच्या मुला सोबत नक्की बघणार.