शेर गंमत म्हणून छानच आहे पण "ज़मीनें हैं बांझ " या बद्दल मी सहमत नाही.भारतभू सुजलाम सुफलाम आहे यात शंकाच नाही. गंगा- यमुनेचे खोरे जगातील सर्वात सुपिक प्रदेश आहे, "दैव देते आणि कर्म नेते "अशी आपली अवस्था आहे....! असे खचितच एखादे अन्नधान्य अथवा फळफलाव असेल जे भारतात पिकत नाही.
"निलंड राज्यकर्ते "आणि कमालीची "निष्क्रीय जनता "हे आमचे दुर्भाग्य आहे. लोकसंख्या वाढ ही अनेक समस्यांपैकी एक आहे ,मूळ समस्या नव्हे.
परफॉरमन्स = competency X contribution
आपल्याकडे potentiial अथवा competency ची समस्या नाही, contribution नाही हा मुददा आहे. competency भरपू र आहे पण कितीही मोठ्या संख्येला शून्याने गुणल्यावर उत्तर शून्यच येते ना?
contribution हे लोकांच्या मानसिकतेमधून येते. आमची मानसिकता " आळशीपणा आणि फुकटेपणा " ही आहे ( सन्माननीय अपवाद सोडून !)आम्हांला कमीत कमी कष्टात अधिकाधिक पैसे हवे आहेत .आम्हाला अधिकतर फुकट ,नसल्यास कीमान कमी किंमतीत ( subsidy) मिळाले तर हवे आहे. कारण आमच्या समोर आमचे राज्यकर्ते सगले वैभव फुकट भोगताना दिसतात. ( गंमतीचा भाग सोदून द्या , जनतेचे सेवक म्हणणारे हे "फुकटे" सार्वजनिक वाहतूक व्यवस्था का वापरत नाहीत ? वापरली तर तिकीट का काढत नाहीत ?)
आणखी एक - महात्मांजींनी सुरू केलेली कायदेभंगाची चळवळ आम्ही विसरायलाच तयार नाही! आमच्याच सरकारविरुद्ध आमचाच कायदेभंग सुरू आहे. जास्तीत जास्त कायदे मोडतो तो आमच्यादृष्टीने मोठ्टा! जो पोलिसांना घाबरत नाही, गुंडागर्दी करतो, त्याला समाजात मान , त्याला लाल दिव्याची गाडी! हे आमचे आदर्श !
आणि आमची तरूण पिढी? कुणीस म्हटलयं " तुमच्या देशातील तरुणांच्या ओठावरील गाणी सांगा , मी तुमच्या देशाचे भविष्य सांगतो" या हिशोबाने , आपली अर्धा इंच कंबर हालवत " कजरारे .... " म्हणणारे ओठ काय कप्पाळ भविष्य घड्वणार ?
जागतिकीकरण्याच्या रेट्यात आपण अंधानुकरण न करता आपला core competence सोडता कामा नये. आम्ही आमचे सत्त्व विसरलो, आम्ही हे विसरलो की आम्ही गरूडाची पिल्ले आहोत, घारीची नाही. हा देश इंग्रजांपूर्वी " देश " म्हणून अस्तित्वातच नव्हता , असल्या भंकसपणावर आमचा विश्वास बसतो, यापरता दुर्दैव कोणते?गतविस्मृत समाज ही आमची समस्या आहे, आम्ही कोण आहोत हेच आम्ही विसरलो. राष्ट्र म्हणून आमची काय ताकद आहे हेच आम्हाला माहीत नाही! आम्ही जगाचे मार्गदर्शक होतो, आहोत आणि राहू.
अर्थात सग्ळेच काही निराशाजनक नाही. परीस्थिती बदलते आहे , मनोगत वर ही चर्चा सुरू करावी असे वाटणे हे ही एक सुचिन्हच !पण वेग वाढायला हवा.