सांज कलताना
प्याले आठवणं
डिफॉल्ट केवळ
माडीची पायरी
लटपटत चुकणं
डिफॉल्ट केवळ
बर्फावर पिऊन
'नीट' झुलणं
डिफॉल्ट केवळ
अंग तुडवून
सरण बांधणं
डिफॉल्ट केवळ
कविता दिसताच
तिला विडंबवणं
डिफॉल्ट केवळ!