दंतकर्मी,
तुम्ही म्हणता ते खरे आहे. आंबोळी ही वेगळी आहे. तांदुळाबरोबर कोणती डाळ वापरतात ते माहिती नाही. ह्या पिठामधे मेथी पण बऱ्याच प्रमाणात घालतात आणी हे पिठ ताकामधे भिजवायचे असते (८-१०) तास. आंबोळी करताना ह्या पिठात भरपूर लसूण घालतात. मुख्य म्हणजे हे पीठ घरी तांदुळ व डाळ पाण्यात भिजवून ठेवून मिक्सर मधुन बारीक करत नाहीत. ह्याचे पीठ चक्कीमधून कोरडे दळून आणायचे असते. मला आंबोळीच्या पिठाचे प्रमाण माहिती नाही. आईला भारतात फोन करुन विचारुन घेईन. मी पण पूर्वी भरपूर प्रमाणात आंबोळी खाल्ली आहे.
रोहिणी