नरेंद्र मोदी अथवा गुजरात मधील राज्यव्यवस्था याबद्दल मला फारशी माहिती नव्हतीच... वर्तमानपत्र वाचून होती तेवढीच...
आपला हा लेख वाचून बरेचसे गैरसमज दूर झाल्यासारखे वाटतेय.
साडेपाच कोटी जनतेचा विचार करून त्यांनी अल्पसंख्य-बहुसंख्य वादाला मूठमाती दिली. नर्मदेचे पाणी पोहचवताना, दुर्गम गावात वीज पोहचवताना ती सर्वांनाच मिळेल याची व्यवस्था झाली. सर्वच गोष्टींत अल्पसंख्यवाद पाहणाऱ्यांना यामुळेच मोदींच्या यशाचे गमक कळले नाही.
हे अगदी पटले. केवळ राजकीय स्वार्थापायी अल्पसंख्यवाद निर्माण करून आणि फक्त त्यांकरता नाममात्र काहीतरी करून आपल्या कार्याचा बोभाटा करणे, याचा मला नेहमीच तिटकारा होता. त्यात सर्वसामान्य जनतेचे काहीही हित होत नाही.
त्यामुळेच अल्पसंख्य-बहुसंख्य वाद सोडून सर्वसामान्य जनतेसाठी कार्य करणारा नेता जास्त लोकप्रिय होतो, हे मोदींच्या यशातून स्पष्टच दिसते.
सूचना : वरील सर्व मते माझ्या अल्पज्ञानावर आधारीत आहेत.