संजोपजी,टोमॅटोत भरलेले वांगे बरे लागते,खूप काही खास वाटले नाही,पण बटाट्याचे ग्राटीन मात्र झकास लागत होते.तुम्ही म्हणता ते खरेच आहे.आपल्याकडचा लग्नसोहळा आणि हे लग्न.. मनात सतत तुलना होतच राहिली.
ऋषिकेश,आपल्या लग्नातल्या 'मिस' केलेल्या गोष्टी वर संजोपजींनी लिहिल्याच आहेत,:) वधूपिता माता सुद्धा आपल्याच बरोबर सर्व गोष्टींचा आस्वाद(जेवणासकट)घेत आहेत हे विशेष वाटले!
अत्यानंदजी,केझंस्पेस्झटलं..(हुश्श! दमले बाबा हा शब्द देवनागरीत लिहून...)केझ=चीज ; स्पेस्झटलं= एक प्रकारच्या लहान नूडल्स. हा पदार्थ जर्मनी,स्वीस आणि ऑस्ट्रीयाच्या बॉर्डरवरील 'बोडनसे'/लेक कॉन्स्टांझ आणि बायर्न येथील खासियत आहे. ह्या नूडल्स घरी बनवतात त्याचे मशीन म्हणजे साधारण आपल्या शेव,चकलीच्या सोऱ्यासारखे असते.
विटेकर,तुम्हालाही २००५च्या जर्मन लग्नाची आठवण झाली,छान वाटले.
हॅम्लेट,अंदाज बरोबर आहे,:)
छायाताई आणि चक्रपाणि, खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्यायला कधीही या,स्वागतच आहे,:)
कुलसागर नवरामुलगा आणि मुलगी आधीपासूनच एकत्र राहत असतात,लग्नखर्च सुद्धा ते दोघं करतात,दोघांचेही आईवडील,भावंडे,मित्र,नातेवाईक हे त्या दोघांचे आमंत्रित असतात,त्यामुळे 'दिल्या घरी..' चा प्रश्न नसतो.
संजोप राव,ऋषिकेश,अत्यानंदजी,अनु,विटेकर,अरुण वडुलेकरजी,बकुळ,सौरभ,वर्षा,हॅम्लेट,सुधीर कांदळकर,छायाताई,चक्रपाणि,कुलसागर,रोहिणी सर्वांना मनापासून धन्यवाद.