डॉक्टरांनी असे वेळीअवेळी संपावर जाऊन रुग्णाना वेठीस धरणे अयोग्य आहे हे खरेच पण त्यांच्यावर अशी वेळ येऊ नये याविषयी शासनाने दक्ष राहणे तेवढेच महत्त्वाचे आहे
सहमत.
जगभरात सगळीकडेच वैद्यकीय पदवी मिळण्यास इतर पदव्यांच्या मानाने जास्त वेळ लागतो. वैद्यकीय शाखेकडे वळताना शिकण्याची वर्षे, वेतन या सगळ्याची कल्पना ठेवून पुढे जाणे आवश्यक आहे. लोकांना औषधे देण्याच्या कामाचे अजुनही तितकेसे व्यापारीकरण झालेले नाही. हे काम सेवाभावाने, किमान वेतनात व्हावे अशीच अपेक्षा दिसते. ते बरोबर की चूक हा मुद्दा वेगळा, पण विद्यार्थ्यांनी या गोष्टीचा विचार बारावीनंतर निर्णय घेताना करायला हवा.