सर्वात प्रथम शरद यांचे अभिनंदन, इतका तरल अनुभव,अचूक शब्दात,गुंफल्याबद्दल!
स्त्रीचा व पुरुषाचा दृष्टिकोन फारसा वेगळा असू शकत नाही. असला फरक ही एक मिथ आहे
मी सुद्धा या बाबत पूर्णपणे सहमत आहे. फरक असलाच तर तो दोघांच्या भावना व्यक्त करण्यात आहे.
स्त्री ला स्वतःचीच कामभावना उमजायला वेळ लागतो, शिवाय संस्कार,कुणासमोर व्यक्त करणार, लोक काय म्हणतील... त्यामुळे तिची झालेली जाणीव हि स्पष्ट पणे शब्दात मांडता येणे कठीण!
एखादा अनुभव केवळ स्त्री ने व्यक्त केला तर तो उत्तान,भडक ठरतो का?