वरदाचे चंद्रपरिणामांचे लेख वाचून मीही काही लिहावे म्हणते. सध्या माणसाच्या उत्क्रांतीचे एक पुस्तक वाचते आहे. ऍक्वाटिक एप सिद्धांत.
इतर एपांप्रमाणे केसाळ नसणे, दोन पायांवर चालणे, हात व पाय वेगळे असणे (म्हणजे पायाची मूठ वळता न येणे) इ शारीरिक बाबीत मनुष्य'प्राणी' वेगळा आहे. हा वेगळेपणा अर्धजलचर (सेमीऍक्वाटिक) जीवनपद्धती मुळे आला असावा असा सिद्धांत काही शास्त्रज्ञांनी मांडला आहे. या सिद्धांताला बळकट करणारे मुद्दे तसेच त्यात न बसणारे मुद्दे याविषयी लिहायचा विचार आहे. पण सुरुवातीलाच मूलभूत संज्ञा येईनात, म्हणून मदतीची हाक देते आहे.
एप Ape - एप म्हणजे बिनशेपटीचा वानर. उदा. चिंपाझी, ओरांगउटांग. मराठीत काय म्हणावे? वानर/ कपी/ ..?
प्रायमेट Primate -एप, मंकी, प्रोझिमियन्स वगैरे गटांना मिळून प्रायमेट म्हणतात. इतर बोटांच्या विरुद्ध दिशेत वळणारा अंगठा हे यांचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे. मराठीत या गटाला काही नाव आहे का?
मंकी Monkey - शेपटीवाली माकडे. उदा. लंगूर, बबून. यांना मराठीत माकडवर्ग म्हणावे का?
तसेच प्लॅसेंटाला मराठीत काय म्हणतात? ऍक्वाटिकचे भाषांतर काय?