बहुरंगी-बहुढंगी (versatile) हे नाव आमीरला सार्थ आहे. लेख चांगला उतरला आहे. स्वतःतून साकार करत असलेल्या पात्रात उतरू शकेल असा एकच अभिनेता हिंदी चित्रपटसृष्टीत असावा असे वाटते. राखमध्ये आमीरचा अभिनय ग्रेट होता असे वाटत नाही परंतु इतक्या कोवळ्या वयात काहीतरी वेगळे, जे फारसे व्यावसायिक नाही ते करून दाखवायची हिम्मत नक्कीच होती.
जो जीता...पासून तो अभिनयाच्या बाबतीत अधिक चोखंदळ होऊ लागला असे वाटते. अंदाज अपना अपना आणि इश्कमधील विनोदी भूमिका, आणि रंगीला, गुलाममधील टपोरी त्याने त्याच ताकदीने रंगवली होती. सरफरोशमधील तरूण एसीपीच्या भूमिकेत लहानखुरा आमीर कसा शोभेल ही लोकांच्या मनातील शंका त्याने अभिनयाने पुसून काढली. दिपा मेहताच्या अर्थमधील भूमिका, लगानमधील भुवन आणि अर्थातच रंग दे बसंतीमधील भूमिका लाजवाब.
मंगल पांडेची भूमिका मात्र फारशी आवडली नव्हती, त्याच्या भूमिकेत . तो चित्रपटही फारसा आवडला नव्हता.
मला वाटतं चांगल्या अभिनयाबरोबर आमीरची उत्कृष्ट व्यावसायिक जाण त्याला पुढे नेण्यास कारणीभूत आहे. फारा वर्षांपूर्वी त्याचे एक शूटींग पाहण्याचा योग आला होता. पायरीवरून उडी मारण्याच्या सीनचे इतके रिटेक्स पाहून त्याची आणि त्याच्या डायरेक्टरची धन्य आहे असे वाटले होते. ते रिटेक्स अर्थातच आमीरला हवे होते, डायरेक्टरला नाही.
म्हणजे फिल्मफेअरचा निकष लावला तर आमिर सलमानपेक्षा थोडा उजवा पण शाहरूखपेक्षा फारच कमी दर्जाचा अभिनेता आहे.
या ठिकाणी पुरस्कारोंपर मत जाओ, अपनी अकल लगाओ हे बोधवाक्य रसिकांना माहित आहेच.
विश्वाचा उगम कसा झाला हे जितके अनाकलनीय आहे तितकेच बाकीचे दोन खान इतके बेसुमार लोकप्रिय का झाले हे ही सांगणे अवघड आहे.
माझ्या मते, एकाला दोन्ही गालांवर खळ्या पडतात त्यामुळे लोक त्याच्या प्रेमात पडत असावेत आणि दुसऱ्याच्या खळ्याही डोक्यापासून पोटा/कमरेपर्यंत कुठेतरी दिसत असतीलच ना? ह. घ्या.