लेख खरोखरच चांगला, अभ्यासपूर्ण आहे. त्याबद्दल सहमती.

द्वारकानाथजींनी म्हटल्याप्रमाणे इतर चित्रपटांचा आढावाही आला असता तर छान झाले असते.
उदा. आतंक ही आतंक (हा, राख, आणि अर्थ १९४७ मी अजून पाहिला नाही )
अंदाज अपना अपना,
मेला (टुकार सिनेमा. ह्या आधी चांगले सिनेमे करूनही इथे का फसला ते माहित नाही), वगैरे वगैरे

तारे जमीं पर त्याचा दिग्दर्शक म्हणून पहिला प्रयत्न.
माझ्या मते हा नाव समोर लिहून केलेले पहिला प्रयत्न. आधी ऐकल्याप्रमाणे हम है राही प्यार के चे ही थोडे (की पुर्ण) दिग्दर्शन नाव न लिहिता केले होते.

फक्त एक जाणवते. ह्यात एकांगी मते लिहिली आहेत असे वाटते. ह्यात आमिर खान बद्दल लिहिले म्हणून (किंवा इतर आवडत नाहीत म्हणून) इतरांबद्दल नकारात्मक लिहिणे आले असे मला वाटते. तुलना करायची असेल तर खरोखरच मग पूर्णपणे व्हायला हवी असे मला वाटते. अन्यथा इतरांचा उल्लेख नको होता असे वाटते. (सुरुवातीचा अमिताभ आणि नसिरुद्दीन शाह ह्यांचा उल्लेख पटतो)
अर्थात मी तिन्ही खानांचा फ्यान आहे. आमिर खानचा अभिनय फार छान वाटतो. तसेच इतरांचाही आवडतो.