मूळ शब्द स्वामिन्. त्याचे प्रथमेचे एकवचन स्वामी. म्हणून स्वामित्वहक्क, स्वामीत्व नाही. विद्यार्थिन् पासून विद्यार्थी, परंतु विद्यार्थिवेतन, विद्यार्थिपरिषद . तसेच हेही .
प्रोपर्टी राइट्स साठी मालकीहक्क काय वाईट आहे? एकस्व हा मला वाटते शब्दकोशातला अधिकृत शब्द आहे. पण स्वामित्वहक्क अनेकदा वाचल्यासारखे वाटते. 'एकस्व'ला हिंदी म्हणून विरोध करू नये हे पटले. ज्या हिंदी शब्दांना मराठीत वेगळाच अर्थ आहे अशा शब्दांनाच वैचारिक लेखनात विरोध असावा. उदाहरणार्थ-- दर्शक, गर्व,(=अभिमान) खाली, लंबाई(=उंची), कर्मठ(=कामसू) वगैरे. आकाशवाणी ह्या सामान्यनामाला मराठीत नभोवाणी म्हणतात. आकाशवाणी म्हणजे आकाशातून होणारी दैवी घोषणा!. आकाशवाणी ह्या विशेष नामाचा इंग्रजी प्रतिशब्द ऑल इंडिया रेडियो. म्हणून आकाशवाणी हे सामान्य नाम नभोवाणी या अर्थाने वापरू नये.
'प्रताधिकार' मराठी विकीसारख्या संकेतस्थळांनी वापरून वापरून प्रचलित केला आहे.