प्रतिसादांबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार.

प्रियाली
सहमत आहे. आमिर चोखंदळ आधीपासूनच होता, त्याचा चोखंदळपणा नंतर वाढत गेला. (मध्येच मेला का केला?) मंगल पांडे मलाही आवडला नाही. काय चुकले माहित नाही पण एकूणात प्रभावहीन वाटला. सरफरोश माझ्या आवडत्या चित्रपटात आहे. यातील आमिर आणि नसीरची जुगलबंदी बघायला मजा येते.

शाहरुख दिसायला चांगला आहे, खळ्या वगैरे. (तसा आमिरही दिसायला टाकाउ नाही) खरे तर शाहरुखमध्ये टॅलेंट आहे पण त्याच्या न बदलण्याच्या वृत्तीमुळे तो वाया गेला असे वाटते. स्वदेसमध्ये आशोतोषने मारुन मुटकुन त्याच्याकडून चांगला अभिनय करून घेतला होता. पण त्याने वेगळे प्रयोग करून पहायला हवे होते. पहेलीमध्ये तो शाहरुखच वाटतो. अकबर बघायची छाती झाली नाही.   असाच हॉलीवूडमधला शाहरुख म्हणजे ह्यू ग्रांट. याच्याकडेही टॅलेंट आहे पण प्रत्येक चित्रपटात चॉकलेट हिरो केल्यामुळे तो नेहेमी ह्यू ग्रांटच असतो. अशा वेळी जर लोकांना तुमची ष्टाइल आवडली तर ते तुमचे फ्यान होतात. याचे आणखी एक उदाहरण म्हणजे देव आनंद. एवढ्यात दुसर्‍याच्या पोटाच्याही खळ्या दिसतात आणि तो ही शर्ट काढतो असे ऐकले होते.

देवदत्त
तुमचे म्हणणे खरे आहे. त्या दोघांविषयी नकारात्मक न लिहीताही लेख लिहीता आला असता. याबद्दल त्या दोघांच्या फ्यानक्लबने क्षमा करावी. खरेतर इतके आसूड ओढण्याची गरज नव्हती. बहुधा मै हू ना चा मनस्ताप असा बाहेर आला. :-) पण प्रत्येकाला आपापल्या आवडीनिवडीचा अधिकार आहे त्यामुळे लोकांना अमुक का आवडते याला कारण असण्याची गरज नाही. भविष्यात लिहीताना काळजी घेईन.
आमिर दिग्दर्शकाच्या कामात ढवळाधवळ करण्याबद्दल प्रसिद्ध आहे. बहुधा यासाठीच रंगीलानंतर त्याची आणि रामूची कट्टी झाली. हम है राही प्यार के चे स्क्रिप्ट त्याने लिहीले होते त्यामुळे यात तथ्य असू शकेल.

द्वारकानाथजी, कामिनी
सहमत आहे. लेखात फारच थोड्या चित्रपटांचा आढावा घेतला आहे. याची कारणे दोन. एक तर मी सर्व चित्रपट पाहिलेले नाहीत. उदा. फना किंवा रंग दे बसंती. त्यामुळे सर्वांवर लिहीणे शक्य नव्हते. तसेच आमिरचे काही प्रसिद्ध चित्रपट मला विशेष आवडलेले नाहीत. उदा. लगान. चित्रपट उत्कृष्ट आहे पण मी परत बघेनच याची खात्री नाही. अशा परिस्थितीत याबद्दल काय लिहावे असा प्रश्न पडला. दुसरे म्हणजे माझे आवडते चित्रपट जसे की दिल चाहता है. याबद्दल आधीच इतके लिहीले गेले आहे की आता नवीन काय लिहावे कळले नाही. तसा लेखही इम्प्रॉम्प्टूच होता. तारे बघितल्यावर राहवले नाही, म्हणून लिहीला. 'लेस इज मोअर' असे काहीतरी करण्याचा प्रयत्न होता, पण तो यशस्वी झाला असे वाटत नाही.

संत सौरभ
दिल चाहता है माझाही आवडता चित्रपट आहे. याच्यातही जावेद अख्तरचा मोठावाटा आहे असे म्हणतात. काही असो कथा, संवाद, अभिनय, दिग्दर्शन लाजबाब आहे. तसाच आमिरचा जुना अंदाज अपना अपनाही मला खूप आवडतो.

स्वाती
आमिर परफेक्शनिस्ट आहे अशी त्याची ख्यातीच आहे. दिग्दर्शक संतुष्ट असला तरी आमिरचे समाधान सहजासहजी होत नाही. तारे बघताना जाणवणारी गोष्ट अशी की सर्व मुलांचा अभिनय उस्फूर्त आहे. जर परत परत टेक घेतले तर असा अभिनय मिळेल की नाही ठाउक नाही. यासाठी मुलांकडून अभिनय करवून घेताना आमिरने दिग्दर्शक म्हणून स्वतःच्या पद्धतीमध्ये काही बदल केले असावेत का?

हॅम्लेट