आशयपूर्ण लेख आणि उत्तम प्रतिसादही. चित्रपटसृष्टीसारख्या मायानगरीत राहून डोके जाग्यावर ठेवणाऱ्या मोजक्या लोकांपैकी एक आमीर. 'रंग दे बसंती' पाहून भारावून जायला होते. आजच आमीरची एक मुलाखत पाहिली, त्यात मुलाखत घेणाऱ्याने मी तुमच्या मिळकतीचे आकडे विचारत नाही, कारण इनकमटॅक्सवाले धरतील, असे म्हटल्यावर आमीरचे उत्तर होते, की नाही, तुम्ही जरुर विचारा, कारण मी पै न पै चा टॅक्स भरतो, आणि तो तसा प्रत्येकाने भरला पाहिजे. टॅक्स वाचवण्यासाठी एन आर आय स्टेटस घेणाऱ्या अमिताभच्या तुलनेत हे उदाहरण डोळ्यात भरते.