वाचकांच्या प्रतिक्रिया वाचल्या.
1. ओलिसांच्या बदल्यात बंदी कैद्यांना न सोडता त्यांना गोळ्या घाला हा पर्याय ‘अमानुष व तालेबानी’ असल्याने तो नको. असा सूर समजला. तुम्ही स्वतः (सर्व भारतीय) किती चांगले आहात. सहिष्णु आहात. याला त्या आणीबाणीच्या वेळेला अर्थ नाही. आतंकवाद समूळ नष्ट करणे हा निर्धार असला तर मग शत्रु पक्षाला मारताना क्रूरता हवीच. पैकी काही आपल्या कैदखान्यात न्यायालयीन प्रक्रियेतून आरोपी म्हणून सिद्ध झाले नसले तरी ज्या अर्थी ते ओलिसांच्या बदल्यात मागितले जातात त्या अर्थी ते शत्रूच ठरतात. त्या वेळी मानवता, सहृदयता अशा गोष्टी थोंबालळल्या तर देशाचे अस्तित्व संपुष्टात येईल.
2. काहींना अण्वस्त्रे टाकून ‘वेळीच’ प्रश्न मिटवावा, असे वाटले. भारताची ‘प्रथम अण्वस्त्र न वापरण्याची प्रतिज्ञा’ अशा वेळी आड येते. शेजारच्या राष्ट्राने मात्र अशी कुठलीही अट मान्य करणार नाही असे ठामपणे सर्व राष्ट्रांना कळवले आहे. यावरून आपणच आपल्या पायात कसे धोंडे बांधून घेतले आहेत. हे लक्षांत येते. अण्वस्त्राच्या उपयोगाबाबत हेही लक्षात ठेवणे महत्वाचे आहे की त्यांच्या रेडिएशन किरणांमुळे जी हानी होते, ती तो बॉम्ब जेथे नेम धरून टाकला जातो, त्याच्या कितीतरी पटीने जास्त असते. किरणोत्सर्गी धूळ व ढग वाऱयाच्या दिशेने पटकन पसरतात. त्यामुळे बॉम्ब जरी परराष्ट्रावर पाडला तरी वाऱ्याच्या दिशेमुळे आपलेच अति नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय प्रथम उपयोग न करण्याच्या आपल्या प्रतिज्ञेनुळे आपली कमांड व कंट्रोल प्रणाली नाश पावली तर नुसते बॉम्ब असून काय करता?
3. चर्चा अन्य मुद्द्यांकडे जाऊ लागली होती. ती श्रावण मोडकांनी संसदेत यावर चर्चा झाली होती असे सांगून पुढे नेली. मात्र त्यात नक्की काय ठरले – झाले, याची कोणालाच खात्रीशीर माहिती नाही. कदचित यामुळेच या फोरमवर निदान ती घडावी असे वाटून लिहिले होते.
4. यापुढे ही चर्चा राष्ट्रीय स्तरावर कशी नेता येईल यावर मार्गदर्शन अपेक्षित आहे.
मीडियाला या प्रश्नाचे जाहिरात मूल्य वाटत नाही. ते कोणीही दखल ही घ्यायला तयार नाहीत. इन्स्टिटयूट ऑफ स्ठ्रॅटॅजिक डिफेन्स स्टडीज सारख्यांच्या फोरमवर याची कोणाला एक महिना झालातरी काही दखल घेतल्याचे दिसत नाही.निदान या ठिकाणी चार लोकांना काही लेखणी चालवावी किंवा टाईपिंग करावेसे वाटले ते ही नसे थोडके.