विशेष नामे अती वापराने पुढेपुढे सामान्य नामे होतात  'आकाशवाणी'चे असेच झाले आहे. वनस्पती तुपाला  डालडा म्हणणे, फोटोकॉपियरला झेरॉक्स मशीन, इमारती तोडण्याच्या यंत्राला जेसीबी, चित्रवाणीला दूरदर्शन, किंवा व्हॉल्व्ह्‌जच्या ऐवजी ट्रान्झिस्टर वापरून केलेल्या बिनतारी संदेशग्राहकाला जसे ट्रान्झिस्टर म्हणतात, तसेच जगातल्या कुठल्याही नभोवाणी केंद्राला, एखाद्याने आकाशवाणी केंद्र म्हटले तर आश्चर्य वाटायचे कारण नाही.  पण मुळात आकाशवाणी म्हणजे ऑल इंडिया रेडियो किंवा आकाशातून ऐकू येणारी परमेश्वर वाणी.