राघु, श्री नाथ, सुनील, अनु, स्मिता१, संदिप, केवडा, को अहम, वीजे,

आपल्या प्रतिसादांबद्दल आणि शुभेच्छांबद्दल शतशः आभार!

मी सुरुवातीला खरेदीच अशी केली होती की जी परदेशी जाणे रद्द झाले तरी पडून रहायला नको. त्यामुळे खरेदीचा सदुपयोग होईल अशी आशा! मुळात मी ऑनसाइटला जाण्यास फारसा उत्सुक नव्हतो. मी कधी स्वतःहून त्यासाठी प्रयत्नही केले नाहीत. मला जी २-३ महत्त्वाची कामे होती ती माझ्या दृष्टीने पहिली प्राथमिकता होती. पण कार्यालयात फार काळ नकारघंटा वाजविणे चांगले वाटत नाही म्हणून मी कसाबसा तयार झालो होतो. परंतु एकदा जाण्याचे ठरविले आणि त्यादृष्टीने मानसिक तयारी करून ठेवली तर मग आपण त्यातल्या चांगल्या गोष्टींकडे अधिक लक्ष देऊन बघायला लागतो आणि मग आपली उत्सुकता ताणली जाते. मग हळू - हळू आपला अपेक्षांचा डोलारा मोठा होत जातो; काहीतरी चांगलं घडतयं या आनंदाचा फुगा फुगायला लागतो. मग अशा परिस्थितीत अचानक तो फुगा फुटणं मनाला क्लेश देऊन जातं हे खरं.

अजून असे अनुभव येऊ द्या.  

-- समीर