प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद.
सुधीर
तारे जरूर बघा. आमिरचे आधीचेही बघायला हरकत नाही. अंदाज अपना अपना धमाल कॉमेडी,
रंगीला हलकीफुलकी प्रेमकथा किंवा सरफरोश ऍक्शन थ्रिलर. पैसे आणि वेळ वसूल होईल याची
ग्यारंटी.
संजोप राव
खरे आहे. चित्रपटसृष्टीतील ९९% मंडळी आपण म्हणजे जगासाठी एक अमूल्य ठेवा आहोत
अशा थाटात वावरत असतात. आणि यात आमिर एखाद्या परग्रहावरून आल्यासारखा वाटतो. कदाचित
म्हणूनही असेल, आमिरचा सरफरोशमधला देशभक्त नायक जास्त खरा वाटतो. आमिरसारखे आणखी
अभिनेते आले तर किती बरे होईल असा विचार बरेचदा मनात येतो. सध्या बॉलीवूड आणि हॉलीवूड
यांचे नाव बरोबरीने घेतले जाऊ लागले आहे. हॉलीवूडमध्येही बरेच अभिनेते फक्त ष्टाइल मारत
असतात, पण त्याचबरोबर खरोखर टॅलेंट असणारेही बरेच आहेत. आणि त्यांना बोलताना ऐकले की त्यांनी त्यांच्या कामाबाबत, दृष्टीकोनाबद्दल किती खोल विचार केला आहे हे
जाणवते. मार्केटच्या दृष्टीने हॉलीवूड आणि बॉलीवूड जवळ येऊ शकेल पण अभिनेत्यांच्या
प्रगल्भतेमध्ये जी दरी आहे ती भरून यायला बराच काळ जावा लागेल असे वाटते. आणि
जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत रामूसारखा हुरहुन्नरी दिग्दर्शकही हॉलीवूडमधून
प्रेरणा घेत राहील असे वाटते.
ऋषिकेश
सहमत आहे. लेखात जितक्या गोष्टींचा उल्लेख आला आहे
त्यापेक्षा कितीतरी गोष्टी यात नाहीत. कदाचित वेगळे लिहायचे या प्रयत्नामध्ये
माझ्या मर्यादा स्पष्ट झाल्या. पंचाला हात घालायचा
नव्हता, चुकून पंचावर पाय पडला .
लेख वाचताना मजा आली हे वचून बरे
वाटले.
हॅम्लेट