तुम्ही वरील लिखाण (कदाचित तुमच्या अनुदिनीवर लिहून तेथून) येथे चिकटवलेले दिसत आहे. ( चू. भू. द्या. घ्या. ) तुम्ही (तेथे) वापरत असलेल्या लेखनसुविधेत ड्या इत्यादि जोडाक्षरे आठवड्यात भांड्यांपासून अशा प्रकारे लिहिली जात आहेत. ह्याचा उद्देश समजला नाही. (आता ती वर बदललेली आहेत.)
लिखाण दोन्ही समासांना जुळवलेले होते. दोन्ही समासांशी जुळवलेला देवनागरी युनिकोड मजकूर इंटरनेट एक्स्प्लोअरर वगळता इतर न्याहाळकांत नीट उमटत नाही. (अक्षरे तुटतात). ह्या विषयी अनेकदा येथे लिहिलेले आहे.
इतरभाषिक शब्द मराठीत लिहिताना मराठी भाषांतर करून वापरणे शक्य नसल्यास उच्चाराप्रमाणे देवनागरीतच लिहावेत. तुम्ही ह्यानुसार ऍडमिशन्स, होस्टेल, एयरपोर्ट, फ्लाईट्स, प्लॅन, बाय हे शब्द अगदी नेमकेपणे देवनागरीत लिहून योग्य दिशेने आश्वासक पाऊल उचललेले आहे. इतरही कांट हेल्प इट, काउंटडाऊन, बिफोर टाईम, इमिग्रेशन हे शब्द देवनागरीत बदलायला एका मिनिटापेक्षा जास्त वेळ लागला नाही.
कृपया सहकार्य करावे.