मीही आमिरचा निस्सिम चहाता आहे.
>यातल्या दर्शील साफरीचे उपजत अभिनयगुणांबद्दल जास्त कौतुक करावे की हे गुण पारखून त्यांना योग्य संधी दिल्याबद्दल आमिरचे जास्त कौतुक करावे हा प्रश्न सुटणे अशक्य आहे.
पण याविषयी असहमत आहे. मुळात ‘तारे जमीं पर’ ह्या सिनेमाशी माझ्यासाठी तरी एक न सुटनार आणि छळणार कोड कायमच जोडल गेल आहे ते म्हणजे अमोल गुप्ते. हा सिनेमा म्हणजे अमोलची ७ वर्षांची तपश्चर्या आहे. तसेच कलाकारांची निवडही अमोलने केली आहे. दर्शीलच्या निवडीसाठी हा माणुस अनेक शाळा फिरला आहे, सुमारे ७० हजार विद्यार्थी त्याने नजरेखालुन घातले तेव्हा दर्शीलची निवड झाली. गीतकार / संगीतकार यांची निवडही त्याचीच आहे. हे सर्व असताना ऐन वेळी त्याच्याकडुन दिग्दर्शनाची जबाबदारी काढुन घेणे हे अनाकलनीय. आज सर्व तारे च्या यशाविषयी चर्चा करताना दर्शील, आमिर, प्रसून यांचच कौतुक करत आहेत. पण मला तरी वाटते की खरा जादुगार पडद्यामागेच राहिला. आणि आशा करतो की भविष्यात ह्या गुणी माणसाला आपला चित्रपट दिग्दर्शित करायची संधी मिळो :-).