मी आमिरच्या विरोधात कुठे बोललो ?
शेवटी तो निर्माता होता चित्रपटाचा, त्याला चित्रपटात बदल करायचा अधिकार होता. हे सर्व तत्वतः मान्य.
अमोल गुप्तेविषयी काही दुवे:
दुवा क्र १
दुवा क्र २
दुवा क्र ३
दुवा क्र ४
यातील अनेक गोष्टी व्यावसायिक हेवे दाव्यांनी प्रेरीत असतीलही. मला इतकच म्हणायचय - ‘तारे जमीं पर’ विषयी भरभरुन बोला. आमिर, दर्शीलची मुक्तकंठाने प्रशंसा करा, पण अमोलचा नामोल्लेख करण्यास मात्र कचरु नका. कारण त्याच्या अनेक वर्षांच्या विकलांग मुलांसाठी केलेल्या कामातून या चित्रपटाची निर्मिती झाली आहे. खर तर तो एक चांगला माहितीपट बनवून अनेक पारितोषिक मिळवू शकला असता. पण चित्रपटाचा संदेश अनेकांपर्यंत पोहोचावा म्हणून त्याने यासाठी एका स्टारची निवड केली. आठ वर्षे त्याने पटकथा लिहिण्यापासुन, कलाकारांची निवड, प्री प्रोडक्शन चे काम आणि पहिले सहा दिवस दिग्दर्शन केल्यावर त्याच्याकडुन हा चित्रपट काढुन घेण्यात आला. स्वतःच्या कलाकॄतीच्या यशापासुन दुर रहाव लागन ह्या पेक्षा कलाकाराच दुसर मोठ दुःख ते कोणत?
(ह्याला कोणीही आमिरवर केलेली टिका समजू नये. कोण चूक आणि कोण बरोबर हा विषयच नाही ए. ही फक्त यशाच्या श्रेयापासुन एका तपस्व्याला दूर रहाव लागतय याची खंत.)