हॅम्लेट,

१. आमिर खान एक सशक्त अभिनेता आहे आणि तो इतर दोन खानानपेक्शा उजवा आहे ही गोष्ट वादातित आहे.

२. "दुसरा त्यापेक्षा जास्त धोकादायक आहे, कारण आपण हे हे करत हसलो आणि माकडचेष्टा केल्या तर त्याचा अर्थ आपण उत्कृष्ट अभिनय करतो अशी त्याची (आणि त्याच्या फ्यानक्लबची) प्रामाणिक समजूत आहे."

शाहरुख खान चा अभिनय बऱ्याचादा हस्यास्पद वाटतो हे ही खरं आहे.  आणि तरीदेखिल मी त्याची खूप मोठी फॅन आहे.

कारण त्याच्या अभिनय सोडून इतर अनेक गोष्टी मला आवडतात. उ. 'अत्यंत मेहनती व्रुत्ती, तो स्टाईल आयकॉन आहे (मानो या ना मानो.) तो  कौटुंबिक माणूस आहे, चित्रपट स्त्रुष्टीमध्ये राहूनही त्याचे चरित्र स्वच्छ आहे, त्याचे बोलने विनोदी असते ( तो ह्युमरस आहे) इ. इ. 

३. कदाचित म्हणूनच आतापर्यंत त्याला (फक्त) चार फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. याउलट किंग खानला दहा (यात मोहब्बतेंसाठी क्रिटिक्स ऍवॉर्ड!!!) तर सलमानला दोन.

या बाबतीत मी आपल्याशी सहमत आहे.... 'फिल्मफेअर पुरस्काराची निवड आणि त्याचे निकष' चुकीचे वाटतात.