असे उंबऱ्याचे कुंपण, करात या हिरव्या बेड्या
तरी जारकर्माच्या मी शिवेवरी कातरवेळी
कळे तुझ्या छळण्यामधली अवीट मज गोडी तेव्हा
छळे तुझे नसणे जेव्हा परोपरी कातरवेळी
तृषार्त माती गंधाळे, बने मृण्मयी मृद्गंधा
(पडूनिया गेल्या गाली पुन्हा सरी कातरवेळी...).. वा . हे तिन्ही शेर अतिशय सुंदर.. खास-करून मक्ता!!
-मानस६