वरदा,

Torque ला 'घूर्णन' असा मराठी (संस्कृत?) शब्द असल्याचे आठवते आहे. अर्थात त्याचा परिणाम एवढाच झाला की मला Torque ची संकल्पना समजायला बरेच दिवस लागले.

जीवशास्त्रात मेंदुची माहिती देताना मेंदुतील वळ्यांना 'संवली' आणि त्यातील खोल खळग्यांना 'सीता' असे शब्द वापरले होते. अर्थात ही पुस्तके राज्यशासनातर्फे छापलेली असल्याने त्यांना काही करुन मराठी शब्द वापरणे भाग असावे. त्यामुळे अर्थाचा अनर्थ होऊ शकतो याची काळजी करायची त्यांना गरज नसावी.

आपण मात्र मराठी प्रतिशब्द शोधताना ते सोपे असतील असे बघायला हवे. नाहीतर ते वापरात राहणार नाहीत. निदान मला तरी असे वाटते.

वायस