इंग्रजीत ऍटिट्यूड हा शब्द स्त्रीलिंगी आहे की पुल्लिंगी आहे, हे जाणून घ्यावेसे वाटते. त्याची ऍटिट्यूड योग्य की त्याचा ऍटिट्यूड?
इंग्रजीत हा शब्द नपुंसकलिंगी असेल असे वाटते!
महेश यांनी 'वृत्ती' स्त्रीलिंगी असल्याने ती ऍटिट्यूड म्हटले असावे असे वाटते. तो ऍटिट्यूड असे म्हणतात/म्हणतो तेव्हा मनात 'दृष्टिकोन' हा अर्थ तर नसतो?
जाता जाता : वृती हा ऍटिट्यूड साठी अगदी नेमका प्रतिशब्द!