चित्रपट चांगला बनवला आहे. कंटाळा येत नाही व आजच्या घटनांचा संदर्भ घेतल्यामुळे हसू ही येतं. भारतात ऍनिमेशन चित्रपट बनतायत व लोकांचाही त्यांना प्रतिसाद मिळतोय ही चांगली गोष्ट आहे. आत्ता आधिक दर्जेदार ऍनिमेशन चित्रपट तयार होतील ही अपेक्षा आहे.

हा चित्रपट बच्चेकंपनीला हसवतो तसेच त्यांना पर्यावरणाचे महत्त्वही सांगतो. तंत्रज्ञानाचा दर्जाही सुधारित आहे. दलेर मेहंदीने गायलेले "आसमां को छूकर देखा" हे गाणं आवडलं, बघायला ही आवडलं.