आपादमस्तकवरून प्रश्न मनात आला की, डोक्यापासून पायापर्यंत न्याहाळणे योग्य की पायापासून डोक्यापर्यंत न्याहाळणे योग्य?
बहुधा पायापासून डोक्यापर्यंत न्याहाळणे हे योग्य असावे. सरळ सरळ डोळ्यांकडे रोखून पाहण्याची आपली "परंपरा" नसावी. लहानांनी मोठ्यांच्या डोळ्यांत पाहून बोलणे म्हणजे उद्धटपणा, स्त्रियांनी पुरुषांच्या डोळ्यांत डोळे घालून पाहणे म्हणजे वाह्यातपणा, उद्धटपणा. पुरुषांनी परस्त्रीच्या चेहऱ्याकडे पाहून न्याहळणेही वाह्यातपणा. तेव्हा सुरुवात पायापासून होऊन डोक्यापर्यंत जात असावी.