पटले.  ऍटिट्यूडसाठी वृत्ती हा सर्वात योग्य शब्द.  'वृत्ती' स्त्रीलिंगी म्हणून ऍटिट्यूड स्त्रीलिंगी.  इथे ट्यूडंत असण्याचा  काही संबंध नाही.  परंतु -ट्यूडने साधारणपणे भाववाचक नामे तयार होतात त्यातली अनेक मराठीत स्त्रीलिंगी आहेत, हे खरे.  इंग्रजी शब्दाचे मराठी लिंग त्याच्या मराठी प्रतिशब्दाच्या लिंगावरून ठरते.  ते हाउस(घर), ती बिल्डिंग(इमारत).  तो ब्रिज(पूल), ती रिव्हर(नदी), तो सी(समुद्र).  तो/ते लेक(तलाव/तळे).   ती मेल(आगगाडी), तो ईमेल(संदेश/निरोप), तो मेल(नर). परंतु ती किंवा ते पोस्टल मेल(डाक/टपाल).  हिंदीत नपुंसकलिंग नाही त्यामुळे इंग्रजी शब्दांचे लिंग हिंदीत  पुल्लिंगी किंवा स्त्रीलिंगीच असणार.  हिंदीत तो पुलिस(मन), परंतु ती पुलिस(यंत्रणा)  वगैरे वगैरे.  मराठीत नपुंसकलिंग आहे तरीही  इंग्रजी शब्दांचे  लिंग मराठीत नपुंसकलिंगी असते हा समज तितकासा बरोबर नाही..