तूर्तास काही शब्द इनट्रान्सलेटेबल वाटतात. उदा.: फर्निचर, विजिलांटे. त्यापैकी हा(ऍटिट्यूड). हे मात्र मान्य नाही. ऍटिट्यूडसाठी, वृत्ती, प्रवृत्ती, मानसिकता, हे तीनही स्त्रीलिंगी शब्द छान आहेत. 'विचारसरणी' मात्र थिंकिंग करिता योग्य. फर्निचरकरता लाकूडसामान हा अर्थ फक्त शब्दकोशातच सापडतो, व्यवहारात कोणी तो शब्द वापरत नाही.
व्हिजिलन्ट म्हणजे दक्ष, सावध, जागरूक. व्हिजिलॅन्टी म्हणजे दक्षता समितीचा सदस्य.