हे चारही स्वर मराठी भाषेत असले तरी त्यांचा उच्चार लहान मुलांच्या मराठी जिभांना स्वरासारखा करता येत नाही.  त्यामुळे मुलांसाठी पहिले पुस्तक म्हणून लिहिलेल्या अंकलिपीतील बाराखडीत त्यांचा समावेश नसतो. प्रौढांकरिता जर अंकलिपी लिहिली तर त्यातील अठरा-खडीत ऍ, ऑ, आणि ह्या चार स्वरानी युक्त अशी व्यंजन-अठराखडी छापावी लागेल.  संस्कृतमध्ये ॡ, अं आणि अ: हे स्वर  नाहीत; मराठीत हे स्वर मानले जातात. संस्कृतमध्ये 'आ' हा, 'अ' चा दीर्घोच्चार समजतात, मराठीत नाही. मराठीत अ/आ + अ/आ = आ होत नाही. त्या + अगोदर = त्याअगोदर;  त्यागोदर नाही!  रामाआधी;  'रामाधी' नाही!  कमास्सल नाही तर कम‌अस्सल.  इ.इ. मराठीत केलं/झालं चे उच्चार केलऽ/ज़्हालऽ असे होतात, केलम्/झालम् असे नाहीत. त्यामुळे मराठी ही संस्कृतपासून आली असली तरी हिंदीप्रमाणेच एक वेगळी भाषा आहे, तिची लिपीपण हिंदी-संस्कृतसारखी दिसली तरी थोडी का होईना, भिन्‍न आहे.