म्हणूनच मी म्हटले मानसिकता जास्त व्यापक वाटते. कारण तुम्ही म्हटल्याप्रमाणे एकदा ती विचारांत परिणत झाली, की प्रसंग/स्थळकाळ/व्यक्ती इ. निरपेक्ष आपण ठराविक कृती नेमाने करू लागतो, कृत्यांमधली लवचिकता हरवते; वृत्ती मात्र त्यातुलनेत सापेक्ष वाटते, व्यक्ती/स्थलकाल/प्रसंग सापेक्ष बदलता येते. कृत्यांमध्ये लवचिकता येते/आणता येते.