मानसिकता, मनोवृत्ती (मेंटॅलिटी) ही (झाल्यास) विचारांत परिणत होते, तर वृत्ती (ऍटिट्यूड) ही (झाल्यास) कृतीत परिणत होते, असे वाटते.
पहिल्या वाचनात पटते. पण दुसऱ्या वाचनानंतर मानसिकता, मनोवृत्ती का बरे परिणत होत नाही, होऊ शकत नाही आणि वृत्ती कृतीतच परिणत होते, असे म्हणणे मला तितकेसे बरोबर वाटत नाही. कारण शेवटी प्रत्येक कृतीमागे भला बुरा विचार असतोच. मग त्याला मानसिकता, मनोवृत्ती म्हणा किंवा वृत्ती म्हणा. शेवटी मानसिकता, मनोवृत्ती आणि वृत्ती ह्या तिघी जणी मनातच असतात ना?

बाकी कानांना सवय झाल्यामुळे म्हणा, मला एकंदर स्त्रीलिंगी ऍटिट्यूड कानांना बरा/बरी वाटत नाही. ऍटिट्यूडला मिशाच शोभतात. ऍटिट्यूड ह्या आत्याबाईंना मिशा आहेत, असेच मी म्हणेन.